रत्नागिरी ; पोल वर चढलेला महावितरणचा कर्मचारी शॉक बसून गंभीर जखमी

0
221
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे रात्री 10 च्या सुमारास लाईट गेल्याने दुरुस्ती साठी पोल वर चढलेला कर्मचारी विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. हा कर्मचारी शॉक लागून तारांच्या जाळयात अडकून पडला होता.

जमलेल्या नागरिकांनी आणि महावितरण कर्मचाऱयांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्याला खाली काढला. अत्यंत जलदगतीने या बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्याला इस्पितळात नेण्यात आले. शहरातील लोटलीकर हॉस्पिटलमध्ये या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून आता तो उपचारांना साथ देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वीज प्रवाह खंडित झाल्यावर काम करण्यासाठी हा कर्मचारी पोल वर चढला होता. अशा वेळी विद्युत प्रवाह कसा चालू झाला ? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here