गुहागर – गुहागर तालुक्यातील पवारसाखरीतील स्थानिकांचा येथे होणाऱ्या मायनींगला विरोध केला आहे. मात्र याठिकाणी राजकीय पुढाऱ्याची स्थानिकांसोबत दादागिरी सुरू असुन याबाबत गुहागर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी संमतीसाठी आमच्यावर सक्ती केल्याची तक्रार राजेश पालशेतकर यांची गुहागर पोलिसात केली आहे.
तालुक्यातील पवारसाखरी येथे होऊ घातलेल्या दगड उत्खन प्रकल्पाला तिथल्या स्थानिकांनी आपला विरोध असल्याचे लेखी पत्र प्रशासनाला दिले आहे.
या ठिकाणी होणाऱ्या या प्रकल्पामुळे आमच्या घरांना धोका निर्माण होणार असुन या ठिकाणचे पाण्याचे स्रोत नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्या मुळावर येणारा हा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका येथील स्थानिकांची आहे. मात्र या गावातील काही निवडक लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी खाण सुरू करण्याचे मनसुबे जे चालू आहेत ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.असा निर्धार स्थानिकांनी केला आहे. पवार साखरीतील या दगड उत्खननातील दगड कोकण एलएनजी च्या ब्रेकवॉटरसाठी वापरला जाणारा आहे. तर या ठिकाणी सुमारे 14 लाख टन दगडाचे उत्खनन यातून होणार आहे अशी माहिती मिळत आहे.