खेड – स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रसाळगडावर अनेक वर्षे गड किल्ले संवर्धनाच काम चालू आहे. त्यातुनच प्रतिष्ठान तर्फे या गडावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छता करण्याची मोहीम नुकतीच राबवण्यात आली.
गेली अनेक वर्षे ह्या पाण्याच्या या टाक्या मध्ये मोठ्या प्रमाणात माती वाहुन आल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. तो स्वच्छ करण्यात आला. तसेच गडावर आठ पेक्षाही जास्त पाण्याच्या टाकी आहेत त्या टप्प्या टप्पान सर्व टाकी स्वच्छ करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली.या स्वच्छता मोहीममध्ये सुयोग चव्हाण, रामचंद्र पेंढारी,प्रज्योत भोईर, बालु ताम्हणकर,आदित्य कळंबटे, यश शिगवण, सार्थक कळंबटे,सुजल शिगवण,सिध्देश कदम अभिनीत कळंबटे,ओंकार कळंबटे ,यश कळंबटे,साहिल चव्हाण,समीर उतेकर,रोहित कळंबटे,सुमित कळंबटे,शुभम कळंबटे,संदेश कळंबटे यांनी सहभाग दर्शवला.