दापोली – दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्र किनारी एक व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. या बाबतची माहिती येथील सर्पमित्र प्रीतम साठविलकर यांनी विनविभागाला दिली. या माशाची लांबी 37 फूट असून वजन अंदाजे 3 टन इतके असावे असा प्राथमिक अंदाज आहे. अश्या प्रकारच्या माशाची उंची 100 फुटा पर्यंत वाढते. हा मासा खोल समुद्रात विहार करतो. भक्ष्याच्या पाठलाग करता अथवा मालवाहुक जाहजाचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज या वेळी वर्तविण्यात आला.
हा मासा मृत होऊन अनेक दिवस झाले असावे त्यामुळे त्याचा काही भाग कुजला होता तर दुर्गंधी देखील येत होती. या घटनेची माहिती दापोली वन विभागाला मिळाल्या नंतर विभागीय वनाधिकारी रत्नागिरी-चिपळूण दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली वनक्षेत्रपाल वैभव बोराटे,दापोली वनपाल तोशिफ मुल्ला,वनरक्षक महादेव पाटील,वनरक्षक सुरेखा जगदाळे, यांनी पाळंदे समुद्रकिनारी जाऊन जेसीबी च्या सहाय्याने त्याला समुद्र किनारी पुरण्यात आले.भरतीची वेळ असल्याने समुद्रात पाणी अधिक होते त्या मुळे या माशाला पुरण्यास अडचणी येत होत्या मात्र वनविभागाने शर्तीने माशाला पुरले.या आधी देखील मुरुड समुद्र किनारी आणि याच समुद्र किनारी या आधी दोन मासे मृत आढळून आले होते.