गुहागर – गुहागर तालुक्यातील चिखली बौध्दवाडीत सुपारी काढताना लोखंडी पाईप विजवाहिनीला चिकटून वसंत लक्ष्मण कानसे यांचा जागीच मृत्यु झाला.
चिखली मांडवकर वाडी येते रहाणारे वसंत कानसे हे आज चिखली बौध्दवाडी येथे प्रशांत दीक्षित यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम करत असताना दुपारी १ वाजताचे दरम्यान ते लघुशंकेसाठी घराशेजारील बागेत गेले. त्याचवेळी तेथे असलेल्या पोफळीवरची सुपारी काढण्यासाठी घराशेजारीच पडलेला लोखंडी पाईप घेऊन पोफळीवरील सुपारी काढण्याचा प्रयत्न वसंत कानसे करत होते. मात्र या बागेतून गेलेली विद्युत वाहिनी त्या पाईपला लागल्याने विजेच्या धक्का बसून वसंत कानसे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.