चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चिपळुणातील वाशिष्ठी आणि संगमेश्वरमधील शास्त्री पूल सद्यस्थितीत अतिधोकादायक असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर आता पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिरीयरिंगच्या माध्यमातून या दोन्ही पुलांचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. आज सकाळपासून हॅमर टेस्ट’ केली जात असून गणेश विसर्जनानंतर पूल बंद ठेऊन स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिटला सुरूवात केली जाणार आहे
दरम्यान, आज नियुक्त एजन्सीजच्या माध्यमातून वाशिष्ठी पुलाची व्हीडीओग्राफी करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीतील पुलांचे बांधकाम किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी प्रारंभीची ‘हॅमर टेस्ट’ला सुरूवात केली आहे. नदीपात्रात केन लावून त्याच्या माध्यमातून पुलांच्या अंतर्गत बांधकामाची तपासणी केली जात आहे. सद्यस्थितीत गणेशोत्सवामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे विसर्जनानंतर पूल बंद ठेऊन पुलाच्या पत्येक भागाची स्वतंत्र तपासणी करून त्यानुसार दुरूस्ती सूचवली जाणार आहे. त्यानंतर पाण्यात असलेल्या पिलर मुळाशी पाणबुड्याद्वारे जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.