पोलादपूर – रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजल परिसरातील तारीक गार्डन ही ५ मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीत ४७ कुटुंबे राहात होती. ती ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.
दरम्यान, या घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत सध्या किती लोक होते याची माहिती घेणे सुरू आहे. मात्रजखमींची आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















