चिपळूण -चिपळूण शहरातील राजकारणाला कंटाळून आपल्याला ज्यांनी या भाजी मंडईतू बाहेर काढले त्यांना आपण नगरपालिकेतुन बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलले असून आपण येत्या रविवारपासून नवीन भाजी मंडई चिपळूण शहरात सुरू करत असून यामध्ये आठवड्यातील दोन दिवस हे सर्वसामान्य जनतेसाठी दहा ते वीस रुपये प्रति किलो प्रमाणे भाजी देणार असल्याची माहिती चिपळूण नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुहागर बायपास रोड येथील पांडवलेणीसमोरील ‘मथुरा’ बिल्डिंगमध्ये नवी भाजी मंडई असणार असुन रविवार दि. २३ पासून ही नवी भाजी मंडई सुरू होत आहे. या ठिकाणी स्वस्त, ताजी आणि होलसेल दरात किरकोळ भाजी विक्री सकाळी १० ते दु. २ या वेळेत आपण करणार असल्याचे सुधीर शिंदे यांनी सांगितले.