548

गुहागर – गुहागर–चिपळूण मार्गावरील चिवेली फाटा येथे एसटी बसमधून उतरत असताना एका महिलेला भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. गुहागर–रत्नागिरी या एसटी बसमधून खाली उतरलेल्या महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येथील एका रुग्णालयात येत होती. ती गुहागर–रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करत होती. चिवेली फाटा येथे बसमधून उतरत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. यावेळी बसचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मदत केली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here