चिपळूण – चिपळूणमधील गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील गणेश मंडळांची बैठक सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गणेश मंडळांची बैठक त्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, चिपळूण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डीवायएसपी ढवळे यांनी शासन निर्णयाप्रमाणे मंडळांना सूचना दिल्या. तसेच शासनच्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.