चिपळूण – गणेशोत्सवसाठी चिपळूणमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण शहरातील शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड येथे स्क्रिनिंग सेंटर तयार केले आहे. तालुक्यात येणाऱ्या सर्व एसटी बसेस, खाजगी गाड्या यांची येथे नोंदणी व तपासणीसाठी येथे येतील. यासाठी ३ शिफ्टमध्ये नोंदणीसाठी ५ पथक नेमले आहेत. यामध्ये नोडल ऑफिसर उपअभियंता भराडे असुन आरोग्य कर्मचारी व पोलीस बंदोबस्त याठिकाणी नेमले आहे. येणाऱ्या चाकरमान्यापैकी ५५ वर्षपेक्षा जास्त असलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसत असल्यास त्यांची रॅपिड टेस्ट घेण्यासाठी डॉ. ज्योती यादव आणि डॉ. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तास टीम नेमली आहे. तिथे स्वाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच कुंभार्ली चेक पोस्ट येथे अतिरिक्त पथके नेमली आहेत.