गुहागर – गुहागर तालुक्यातील अडुर येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी धुमाकूळ घातला त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे.
अडुर येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अडूर, कै. कमलेश हळये यांचे भाजीपाला केंद्र, उमेश सैतवडेकर यांचे श्री. लक्ष्मी गणेश ज्वेलर्स व बामणे यांचे फरसाण मार्ट याठिकाणी भुरट्या चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अद्याप पर्यंत पंचनामा झालेला नसल्यामुळे कोणाचे कितपत आर्थिक नुकसान झाले आहे ते समजू शकले नाही. मात्र कमलेश हळये यांचे अंदाजे तेरा हजार तर बामणे फरसाण मार्ट यांचे दोन हजाराच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याचे कळते.
गेल्या महिन्याभरात पंचक्रोशीतील तीन ठिकाणी झालेल्या चोरीचा स्वरुप पाहता चोरी करणारे चोर एकसारखेच असल्याचे निदर्शनास येते.