गुहागर ; युती असताना सुद्धा शिवसेना तालुकाप्रमुखांचा पराभव

0
106
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर नगरपरिषदेच्या आज लागलेल्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. त्यामध्ये पुन्हा-पुन्हा निवडणूक लढणाऱ्या जनतेने चोख नाकारले. या निकालाने संबंधितांना जोरदार धक्का बसला आहे.

चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ

आज गुहागर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार नीता मालप या तब्बल 900 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पारिजात कांबळे यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीत असेही काही निकाल लागले जे लक्षवेधी ठरले आहेत.

यामध्ये प्रभाग एक मधून या निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना सुद्धा गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग दहा मधून भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक राजेंद्र आरेकर हे निवडणूकला सामोरे गेले. पण तिथे त्यांना शिवसेना उमेदवार प्रदीप बेंडल यांनी धूळ चारली. तर राज्यभरात एकीकडे महायुती अनेक ठिकाणी एकत्र असताना मात्र गुहागर नगरपंचायत मध्ये अजित पवार गट यांनी महायुती नाकारून स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि युतीसमोर आव्हान उभं केलं मात्र या निवडणुकीत त्यांनाही जनतेने नाकारल्याचे चित्र समोर आले आहे.

तर याच गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र भागडे हे प्रभाग क्र. 13 मधुन विजयी झाले. तर त्यांचा मुलगा सौरभ भागडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाग 14 मधुन विजयी झाले. दोन पक्षातून उभे असलेले बाप बेटे विजयी झाले आहेत. प्रभाग 13 मध्ये शिवसेना भाजप युतीकडून राजेंद्र भागडे हे उमेदवार होते. त्यांना 177 मते मिळाली. त्याचप्रमाणे या निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या मनसेनेही आपले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 4 मधून कोमल जांगळी यांनी विजय मिळवला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here