मार्गताम्हणे – गुहागर चिपळूण मार्गावरील मार्गताम्हणे येथे काही दिवसापूर्वी गुहागर आगारातील चालक वाहक हे दारूच्या नशेत आढळून आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत बस मधील सर्व प्रवाशांना उतरवून घेतले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याचवेळी प्रगती टाइम्सने याबाबत सडेतोड प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुहागर आगारातील चालक आर एम गोडसे आणि वाहक एस एम हारले यांना निलंबित केले आहे.
गुहागर – चिपळूण बस वरील चालक वाहक दारूच्या नशेत..?
गुहागर आगारातील बस क्रमांक MH20 BL 1542 ही गाडी चिपळूण निघालेली असताना या एसटी बस मधील चालक आणि वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्याचवेळी ही बस मार्गताम्हणे येथे आले असता त्या बसमधील काही प्रवाशांनी स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. बस मधील स्थिती पाहताच स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील सर्व ग्रामस्थांना उतरवून बस थांबून ठेवली होती. मात्र सर्व ग्रामस्थ एसटी बस मधून उतरताच चालक वाहकाने रिकामी बस चिपळूणकडे पळून गेली. त्यानंतर काही वेळातच चालक आणि वाहक दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर काहीजणांनी याबाबतची माहिती गुहागरचे आगार प्रमुख यांना फोनवरून दिली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ या चालका वाहकांबाबत माहिती घेण्यास सांगितले होती. ही बस चिपळूण स्थानकावर जातात त्या बस वरील चालक व वाहकाची आगारप्रमुखांनी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतली आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आलेल्या अहवालात त्या बस वरील चालक व वाहकांना निलंबित करण्यात आले. एसटी महामंडळाने केलेल्या या कारवाईमुळे अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही बसवर चालक व वाहक ड्युटीवर असताना दारूच्या मेसेज आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचा अहवाल एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.















