गुहागर ; क्रिकेट खेळण्यामधील वाद तरुणावर झाला चाकू हल्ला

0
3494
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे .खुनी हल्ला करणाऱ्या त्या नराधमास गुहागरच्या पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केल्याने गुहागर पोलिसांचे सध्या सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळत असताना सत्यजित पटेकर व ऋषिकेश नाटेकर यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला याच वादाचे रूपांतर सायंकाळी सात तीस वाजता हाणामारीत झालं. यावेळी आरोपी सत्यजित पटेकर यांनी नवानगर येथील भट्टी जवळील पुलावर ऋषिकेश नाटेकर ,अभय पालशेतकर ,अवधूत कोळथरकर असे गप्पा मारत बसले असताना अचानक पाठीमागून येऊन ऋषिकेश पटेकर याचा पाठीत चाकूने वार केले. त्याचवेळी आणखीन काही वार पोटात करत असताना त्याच्या मित्रांनी त्याला पकडले यावेळी तुम्ही मला अजून ओळखत नाही. याआधी सुद्धा मी मर्डर केलेला आहे. त्यामुळे मला मर्डर कसा करतात हे माहिती आहे.असं म्हणत या सर्व जणांना शिवीगाळ केली आणि त्या ठिकाणावर निघून गेला. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या ऋषिकेश याला स्थानिकांनी अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ही घटना गुहागर पोलिसांना समजतात गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिसांनी त्वरित सापळा रचत आरोपीला 12 तासाच्या आत अटक केली. सध्या आरोपी गुहागर पोलिसांच्या ताब्यात असून या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक भोपळे ,प्रितेश रहाटे ,राजेश धनावडे ,सतीश कुंभार ,आशिष फुटक वैभव चौगुले ,आदींनी अथक प्रयत्न करत आरोपीला अटक केली सध्या या प्रकरणाचा तपास गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here