गुहागर – ( लक्ष्मीकांत घोणसेपाटील ) – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम आयोजित मोफत आरोग्य शिबिर शनिवार दिनांक 29 मार्च रोजी भवानी सभागृह, शृंगारतळी पालपेणे रोड येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांनी दिली.
या आरोग्य शिबिरात जनरल तपासणी, स्त्रिरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, बिपी, शुगर, एसीजी (मोफत अँजिओग्गग्रफी, ऍजिओप्लास्टी, बायपास), नेत्र तपासणी (मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप), कॅन्सर थर्मल टेस्टींग (सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञाच्या उपस्थितीत) आदींची तपासणी होणार आहे.
त्याचप्रमाणे रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरादरम्यान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने तसेच शिवसेना गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांच्या सहकार्याने तालुक्यातील रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
ही पत्रकार परिषद शृंगारतळी येथील शिवसेना गुहागर तालुका संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे, तालुका सचिव ऍड संतोष आगरे, उपतालुका प्रमुख सुशील आगरे, सुधीर कडव, महेश जामसुतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराचा तालुक्यातील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन दीपक कनगुटकर यांनी केले आहे.