गुहागर -गुहागर तालुक्यातील देवघर येथे शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसृष्टीवर आधारित असा छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
देवघर येथील सप्तेश्वर प्रतिष्ठान यांच्या विद्यमानाने छावा हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. देवघर गावातील सहानेवर एका मोठ्या पडद्यावर हा चित्रपट दिनांक 16 मार्च रोजी संध्याकाळी नऊ वाजता दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट संपूर्णतः फ्री असून यासाठी कोणतेही चार्ज आकारले जाणार नाही. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी हा चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान सप्तेश्वर प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.