शृंगारतळी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्यावतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील महिला डॉक्टर व सर्व महिला कर्मचारी यांचा स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतच्या सरपंच मानसी कदम यांचाही स्त्री शिक्षणाच्या जनक यांची प्रतिमा देऊन मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. शशिकला वाडकर यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून सर्व रुग्णांची सेवा केली. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी सर्व आरोग्य सेविका यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली म्हणूनच अनेक रुग्ण कोरोना पासून वाचू शकले आहेत त्यामुळे या सर्व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या वेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, राहुल जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.