खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम याचे कट्टर विरोधक असलेले संजय कदम आता लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.दरम्यान त्या आधीच त्याची उबाठाच्या शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक जारी करण्यात आलेले आहे.
जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी रत्नागिरी (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव,शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.