वाई – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, वाई गावच्या हद्दीत बंद पडलेल्या कंटेनरला भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असुन दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पाचवड गावच्या हद्दीत बंद पडलेल्या कंटेनरला सातारहून पुण्याच्या दिशेला भरधाव वेगात निघालेल्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. यात कारमधील सलमा मोमीन आणि महिदा शेख या दोन महिला जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन दोन्ही मृतदेह पोलिसांनी शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले आहेत.
तर भुईंज पोलिस अधिक तपास करत आहेत.