चिपळूण – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणखी एक बडा नेता नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
त्याला कारण ही तसंच आहे.आमदार भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त करणारं वक्तव्य केलं तर दुसरीकडे त्याचं वेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे या नेत्याला आपल्या पक्षात येण्यासाठी उघडपणे हाक दिल्याने याबाबतच्या चर्चांना जास्त उधाण आलं आहे.
भास्कर जाधव यांचं ते विधान ……..
“बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, माझा शिवसैनिक हा निखारा आहे. त्याच्यावर थोडी राख साचली की त्याला फुंकर मारावी लागते. एकदा फुंकर मारली आणि ती राख उडून गेली तर तो निखारा पुन्हा प्रज्वलित होतो. पुन्हा त्या निखाऱ्यातून आग ओकायला सुरुवात होते. शिवसैनिक हा थोडीसी राख साचलेल्या निखाऱ्यासारखा आहे. त्याच्यावर साचलेली थोडीसी राख झटकण्याची गरज आहे”, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. तसेच “मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
उदय सामंत यांचं विधान………भास्कर जाधव हे विधीमंडळातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरु शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. अशा व्यक्तीचं भविष्यात आम्हाला मार्गदर्शन मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करु”, असं सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.त्यामुळे कोकणात सध्या एकच खळबळ माजली असून अनेक ठिकाणी नाक्या नाक्यावर याबाबत चर्चा सुरू आहेत.