वाई विधानसभा मतदारसंघ ; महाविकास आघाडीकडून नितीन सावंत यांना उमेदवारी.?

0
1237
बातम्या शेअर करा

वाई (प्रविण गाडे) – वाई मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उमेदवार विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून कोण निवडणूक लढवणार याच्या चर्चाच मतदारसंघात रंगत होत्या. परंतु राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. नितीन सावंत हेच उमेदवार असतील अशी माहिती राजकीय सूत्राने दिली.

लोकसभेनंतर वाई विधानसभेला सावंत विरुद्ध पाटील अशीच लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत नक्की कोण उमेदवार असणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाई विधानसभा मतदारसंघ ; महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी ..?

एकीकडे आ. मकरंद पाटील यांचा वाई विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क तर दुसरीकडे डॉ. नितीन सावंत यांचा विकासासाठीचा झंजावात या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करू शकतो. डॉ. नितीन सावंत यांच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी आणि जनतेचे पाठबळ असेल. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here