दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुहागर- तुळजापूर बस सेवेचा प्रारंभ

0
193
बातम्या शेअर करा

गुहागर – गेल्या अनेक दिवसापासून कोकणातील गुहागर येथून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गुहागर –तुळजापूर बस सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती हीच बस आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली आहे.

गुहागर आगारातून अनेक व्यापारी ,आई तुळजाभवानीचे भक्त ,विद्यार्थी ,सरकारी कर्मचारी हे मराठवाड्यात जात असतात. यांच्याकडून गुहागर आगारातून तुळजापुरला जाणारी बस सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. याआधी ही बस सुरू होती मात्र काही तांत्रिक कारण देत आधीच्या आगार प्रमुखांनी ही बस बंद केली होती. मात्र गुहागर आगारात नव्यानेच आलेले नूतन आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी प्रवासी वर्गांची ही मागणी तातडीने वरिष्ठांकडे पोचवून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुहागर- तुळजापूर ही गाडी सुरू केली
गुहागर आगारातून सकाळी 5. वाजून 30 मिनिटांनी ही गाडी सुटेल ही गाडी चिपळूण, पाटण ,कराड, विटा, आटपाडी, पंढरपूर ,सोलापूर मार्गे तुळजापुरला जाईल तर सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी तुळजापूर वरून गुहागर कडे मार्गस्थ होईल तरी भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान गुहागर आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here