गुहागर -पुणे आगाराच्या चालक वाहकांना खेड शिवापुर टोल नाक्यावर मारहाण… पोलीस तपासात दिरंगाई..

0
419
बातम्या शेअर करा

पुणे – पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर या टोल नाक्यावर गुहागर आगाराच्या चालक वाहकांना मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली याबाबत गेल्या तीन दिवसापासून पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक किंवा कारवाई केली नसल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमधून संताप आणि नाराज व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर -चिपळूण बस गेली चोरीला..?.. शोधा शोध आणि बरेच काही..

पुणे – बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर गुहागर आगाराची गुहागर- पुणे ही गुहागर आगारातून सकाळी नऊ वाजता सुटली होती. या बस मध्ये जवळपास 53 प्रवासी प्रवास करत होते. संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान ही बस खेड शिवापूर टोलनाका येथे आली असता त्याच वेळी या टोल नाक्यावर एका ट्रक चालकाने या बसला साईड देताना दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याबाबत गुहागर आगाराच्या चालकाने त्या ट्रक चालकाला याबाबत विचारणा केली असता त्या ठिकाणी असणारे 10 ते 15 जणांनी गुहागर आगाराच्या प्रवीण नागरे या चालकाला बेदम अशी मारहाण केली. यावेळी जी बाचाबाज होत होती ती सोडवण्यासाठी या एसटी बसवर काम करत असणारे वाहक शेषराव कल्लोळ यांनी मध्यस्थी केली त्यावेळी त्यांनाही मारण करण्यात आली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खेड शिवापुर येथील पोलीस या प्रकरणात अद्याप का तपास करत नाहीत..? या प्रकरणात अद्याप कोणाला का अटक करत नाहीत..? पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे. याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या गुहागर पुणे आगाराच्या बसवर काम करणारे चालक वाहक सध्या तपासाच्या नावाखाली पुणे येथेच आहेत. तीन दिवसापासून एसटी महामंडळाच्या चालक वाहकांना मारहाण झालेली असताना सुद्धा पोलीस कोणतीच दखल घेत नसल्याने सध्या सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकीकडे एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी किंवा वेतन वाढीसाठी अनेक राजकीय नेते संघटना या पुढारपण करत असतात मात्र यावेळी या एसटीच्या कामगारांना मारहाण होऊन तीन दिवस उलटत आले तरी ही अद्याप कोणत्याच संघटनेने किंवा राजकीय पुढार्‍याने पुढाकार घेतला नसल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here