आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाने घेतली अजित पवारांची भेट..

0
412
बातम्या शेअर करा

चिपळूण – ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आलेले असताना विक्रांत जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी गप्पा मारल्या.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.


भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची गुहागर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा आहे. मागील विधानसभेवेळी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. यावेळी विधानसभा लढायची, त्यामुळे अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहे. अजित पवार यांची भेट घेऊन विक्रांत जाधव आणि भास्कर जाधव यांचे पक्षावर दबावचंत्र टाकण्याचे प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन “मला काही सांगायचे आहे..” असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. राष्ट्रवादीत असताना मंत्री होतो तरीही शिवसेनेने मला मंत्रिपदाची संधी नाही, याचे शल्य बोचत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर एकप्रकारे जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here