गुहागर – गेल्या काही दिवसापासून गुहागर आगाराचे वेळापत्रक हे नियमित होत नसल्याने ते चर्चेत होतं. मात्र आजही चक्क आगार प्रमुखांच्या आदेशाने नियमित सुटणाऱ्या गाड्या दीड तास उशिरा सुटल्याने विद्यार्थी आणि प्रवास वर्गाला नाहक ताटकळत बसावे लागले त्यामुळे इतर वेळी वेळेवर बस न सोडणाऱ्या चालक वाहक आणि मेकॅनिकल वर्गाला कारणे दाखवा नोटीस देणाऱ्या आगार प्रमुखांना आता जाब कोण विचारणार .? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिलाय
…….अखेर त्यांनी करून दाखवलंच……गुहागर आगारातून लांब पल्याच्या अनेक बस बंद..
गुहागर आगारातून नित्यनियमाने जाणाऱ्या अनेक गाड्या आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून एकाच जागेवर उभ्या होत्या कारण विचारलं असता अनेक चालक वाहकांनी असं सांगितलं की आगार प्रमुख यांच्या आदेशाने आम्ही थांबलो आहोत. याबाबत अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले की कुठल्यातरी खाजगी कंपनीने आपलं प्रॉडक्ट विकावेत यासाठी आयुर्वेदिक कॅम्प लावला होता. आणि त्या कॅम्प साठी सर्व चालक वाहकानी हजर राहावे असे तोंडी आदेश आगार प्रमुखांनी दिले होते. त्यामुळे त्या आदेशाला आता ठोकरायचे कसे.? त्यामुळेच सर्व चालक आणि वाहक यांनी आपली ड्युटीचे टायमिंग झालेले असताना सुद्धा फक्त आगारप्रमुखांच्या आग्रहाखातर त्या शिबिराला हजर राहिले परिणामी साडेअकरा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गुहागर आगारातून एकही बस सुटली नाही. माञ दुपारी एक वाजता ज्या काही गेल्या दीड तासात बस खोळंबून होत्या त्या सुटल्या. त्यामुळे प्रवासी वर्गाला आणि विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. गुहागर चिपळूण मार्गावर तब्बल एकाच वेळी चार बस सुटल्या. तर चिपळूणमध्ये गुहागर आगारातून वेळेवर बस न आल्याने अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला या कालावधीत एसटीचं जे आर्थिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला. तर हे खाजगी शिबिर कोणाच्या आदेश घेण्यात आले होते.? का असा प्रश्नही त्या निमित्ताने उभा राहिला आणि जर हे खाजगी शिबीर घेण्यासाठी टाइमिंग ला सुटणाऱ्या बसेस थांबवून ज्यांनी त्या खाजगी शिबिराला चालक व वाहकाना हजर राहण्यासाठी सक्ती केली त्या आगार प्रमुखांवर आता वरिष्ठ काय कारवाई करणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.