रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बनावट नोटा वितरित करणारे आणि काही बनावट नोटा बाजारात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र नुकत्याच झालेल्या तपासात रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून अजून किती ठिकाणी बनावट नोटा आहेत याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर राजेंद्र खेतले , संदीप निवलकर , आणि ऋषिकेश निवलकर यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले. त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी अधिक तपास करत असताना रत्नागिरीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.
गुहागर बोगस नोटा प्रकरण ; तालुक्यातील या नामवंत ग्रामपंचायत मधील सरपंचावर गुन्हा दाखल
गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट नोटप्रकरणी अटकसत्र सुरू केल्यानंतर त्याने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाझुडपात फेकून दिली. गुन्हे शाखेने ही मशीन जप्त केली आहे. हुबेहूब वाटणाऱ्या नोटा मशीन तपासणाऱ्या मशीनमध्येसुद्धा ओळखल्या जात नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारात चलनात आणल्याचे समोर आले.
गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सावंत, पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश तोडकर, धनराज चौधरी, पोलिस अंमलदार चिकने आणि डफळे यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चिपळूण, रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सतत पूर परिस्थिती असतानाही मुंबई-रत्नागिरी-चिपळूण असा वारंवार प्रवास करून गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.