गुहागर– महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा अधिवेशन कार्यक्रम राज्यभर जाहीर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरी विभागाचे अधिवेशन ३ आँगस्ट रोजी पाटपन्हाळे येथील श्री पूजा सभागृहात आयोजित करण्यात आले असून आमदार नितेश राणे हे प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या या मतदारसंघात नितेश राणे कार्यकर्त्यांना काय सूचना देणार किंवा काय मार्गदर्शन करणार त्याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागून राहिले आहे.
चिपळूण ; पत्रकारांची बदनामी; पोलीस ठाण्यात पत्रकारांचे निवेदन त्या पोस्ट तयार करणाऱ्यावर व व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी
शृंगारतळी येथील पत्रकार परिषदेत उत्तर भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले, हा अधिवेशन कार्यक्रम वरिष्ठ स्तरावरुन प्रत्येक जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांचे मिळून हे अधिवेशन गुहागर येथे होत आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नितेश राणे यांच्यावर गुहागरची जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिवेशनासाठी निमंत्रित प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले असून गुहागर तालुक्याचे स्वतंत्र अधिवेशन ७ आँगस्ट रोजी होणार आहे.
गुहागर विधानसभेची जागा ती पूर्वीपासून भाजपची असल्याने महायुती म्हणून ही जागा विधानसभेला लढविण्यात
येणार असून ती जिंकण्यासाठी आम्ही कामाला लागले आहोत. आमचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीने जाहीर केलेल्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. लोकसभेला गुहागरमध्ये सर्वाधिक मताधिक्य विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मिळाले. मात्र, आम्ही विधानसभेला सामोरे जाताना बूथ कार्यक्रम राबवून प्रचारावर भर देणार असून मतदार जोडण्याचे काम करणार आहोत.या पत्रकार परिषदेला गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, दिनेश बागकर,तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हरिष वेल्हाळ आदी उपस्थित होते.