पाचवीला पुजलेला संघर्ष….बेधडक धाडसी स्वभाव….प्रचंड आक्रमक…पण सर्वसामान्य गोरगरिबांसाठी अहोरात्र धावून जाण्याची तयारी….कपाळी भला मोठा नाम…..भारदस्त कुरळी दाढी….आणि छातीची दोन बटणे उघडी…..जाग्यावरकच “अरे ला कारे”करणारा शिवसेनेला शोभेल असाच तालुकाप्रमुख….. पण त्याच्या या नेतृत्वाला देखील कोणाची तरी नजर लागली…..कूटनीतीने त्याचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न झाला…….पण मागे हटेल तो संदीप सावंत कसला….? तो लढतो आहे…..भिडतो आहे…..सामान्य शिवसैनिकांचा आवाज बनून तो कुटणीतीला जाब देखील विचारतो आहे…..आशा या संघर्षयोद्याच्या वाढदिवसानिमित्त……
वाढदिवस रोजच होत असतात पण काही वाढदिवस हे खास असतात.जे नेतृत्व संघर्षातून तयार होते.ते पुढे इतिहास घडवतात.असाच संघर्षनिर्मित नेतृत्व म्हणजे आमचा मित्र “संदीप सावंत”…अत्यंत हलाखी व गरिबीतून पुढे येऊन स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या या नेतृत्वाला कोणती संज्ञा द्यावी हा प्रश्नच आहे.पण चिपळूणच्या ग्रामीण भागातून पुढे येऊन ज्याप्रमाणे तो सर्वसामान्य जनतेचा मसीहा म्हणून काम करत आहे,त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने मानवंदना दिलीच पाहिजे.
काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून संदीपने केलेले काम सर्वज्ञात आहेच.पण त्यावेळी कोणाची तरी नजर लागली आणि एका फाजील मनोवृत्तीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.त्यालाही धैर्याने सामोरे जाऊन मृत्यूला पळवून लावणाऱ्या या कडवट रक्ताला खासदार विनायक राऊत यांनी बरोबर हेरले आणि शिवसेनेच्या कवचकुंडल्यात घेतले.येथेच संदीपच्या कर्तुत्वाला खरा वाव मिळाला.निखाऱ्यातून झळाळून हे सोने असे काही चमकले की चिपळूणच्या ग्रामीण भागात त्याचे पडसाद उमटू लागले.
२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे शिवसेनेचे ब्रीद संदीप सावंत यांनी लीलया आत्मसाद करून कामाला सुरुवात केली.आंदोलने म्हणजे त्यांचे हत्यारच,सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी त्याचा उपयोग करून भल्याभल्यांना नामोहरम करणारा हा कार्यकर्ता…. चिपळूणमध्ये झालेले मुंडन आंदोलन,टेरव नळपाणी योजनेसाठी गुरेढोरे आंदोलन,आणि सर्वात महत्वाचे नमन या कोकणातील लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यामध्ये यश संपादन करणारा संदीप सावंत देखील सर्वांनी अनुभवला आहे.असुर्डे येथे रेल्वे स्थानक व्हावे म्हणून त्यांनी उभारलेला संघर्ष इतिहासात नोंद करण्यासारखाच आहे.करोना काळात हा शिवसैनिक असा काही भिडला की त्याचे मोल आता करताच येणार नाही….करोना बाधितांना हॉस्पिटल मिळवण्यापासून ते त्यांच्या नातेवाईकांना सर्व सुविधा देण्यासाठी अहोरात्र झटणारा संदीप सावंत संपूर्ण चिपळूणने त्यावेळी पाहिला.तोंडली-पिलवलीचा प्रस्तावित खाडी पूल हे त्यांच्या कामाची पोचपावती देणारे आहे.त्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारा संदीप आम्ही पाहिलाय, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आणि उद्भवणाऱ्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आरे ला का रे करण्याचे धाडस संदीप सावंत सारखाच शिवसैनिक दाखवू शकतो…..चिपळूणचे एसटी स्टँड जर आज कोणामुळे मार्गी लागत असेल तर त्याचे नाव शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत आहे.हे सांगण्यासाठी तज्ञांची गरज नसावी,
भिडायचे…नडायचे… आणि रिझल्ट द्यायाचा….असा रक्तात,नसानसात शिवसेना भिनलेला हा शिवसैनिक…चिपळूण शिवसेनेचा हा आश्वासक चेहरा..या पुढे देखील त्याने अशाच पद्धतीने नेतृत्व करून सर्वसामान्य जनतेची सेवा करावी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एक सक्षम नेतृत्व द्यावे ही असंख्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असताना संदीपच्या नेतृत्वावर हिडीस वक्रदृष्टी पडली.त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला गेला.परंतु हा पट्ट्या गप्प न बसता थेट संघर्षाला उभा ठाकला आहे.यथावकाश त्याचा संघर्षाला यश मिळेल आणि हा कडवट शिवसैनिक पुन्हा मैदानात उतरून सर्वसामान्यांचे नेतृत्व करेल याची खात्री आम्हा सर्वांना आहे.
आई भवानी उदंड निरोगी आयुष्य या आमच्या मित्राला देवो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…… एक मित्र..