उमरोली येथून बांगलादेशी नागरिकाला अटक दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

0
1353
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनवर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई सत्र सुरुच असून आज पुन्हा एकदा एका बांगलादेशीला नागरिकाला चिपळूण तालुक्यातील उमरोली येथुन अटक करण्यात आल्याने चिपळूण तालुका हा बांगलादेशी नागरिकांचा अड्डा बनला की काय असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला आहे.

अशी ही अजब ग्रामपंचायत ; माहिती अधिकारातील माहिती दिली चक्क 120 दिवसानंतर….

आज तालुक्यातील गुढेफाटा येथे सुरु असलेल्या बांधकामा ठिकाणाहून रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाने एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. हा बांगलादेशी अनेक वर्षांपासून भारतात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महम्मद युनूस यामीन मुल्ला (सध्या उमरोली, मूळ-नाराईल-गालीया नाथा, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. मात्र चिपळूण तालुक्यातील या उमरोली गावात हा बांगलादेशी नागरिक किती दिवसापासून राहत होता त्याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच त्याला येथील कोणी स्थानिक मदत करत होता का याची चौकशी पोलीस करत आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आपल्या गावात किंवा आपल्या शेजारी एखादा भाडेकरू अथवा एखादा नवीन रहिवासी राहायला आला तर त्याची माहिती जवळच्या पोलिस स्थानकांना द्यावी असे आदेश असताना सुद्धा उमरोलीतील या नागरिकांनी त्या आदेशाचे का पालन केलं नाही असा प्रश्न त्या निमित्ताने उभा होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here