चिपळूण – एखादं शासकीय कार्यालय किती महत्त्वपूर्ण काम करतं हे याच बातमीतील फोटोत आपल्याला पाहून दिसत असेल. चिपळूण शहरातील भूमी अभिलेख कार्यालय रात्रीचे नऊ वाजून गेलेत तरी या कार्यालयातील कर्मचारी अद्याप काम करत आहेत. त्यामुळे अहोरात्र काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे सध्या चिपळूण मधील सर्वच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र हेच ऑफिस दिवसा कासवाच्या संत गतीने काम करते आणि रात्री मात्र तेवढा उत्साह व झपाट्याने काम करत असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे या कार्यालयात रात्रीस खेळ चाले असा अनुभव तर येत नाही ना याची चर्चा सध्या संपूर्ण चिपळूण सह रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी हे कार्यालय कशासाठी उघडे होते या रात्रीच्या वेळी या कार्यालयात कोणतं काम चालू होतं याची माहिती घेऊन सर्वसामान्यांना त्याची माहिती द्यावी. म्हणजे सर्वसामान्य नागरिक रात्री नऊ वाजता सुद्धा आपले काम घेऊन या कार्यालयात येता येतील अशी चर्चा सध्या चिपळूण मधील नागरिक करत आहेत.