संभाजी भिडेंच्या चिपळूण दौऱ्याला तीव्र विरोध!

0
323
बातम्या शेअर करा

चिपळूण – वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात चिपळुणातही तीव्र असंतोष पसरला आहे. भिडे हे चिपळूणच्या दौऱ्यावर येत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिपळूण तालुका काँग्रेससह, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांच्यासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी एकत्र येऊन भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला परवानगी देऊन नये, अशी मागणी करणारे निवेदन आज प्रांताधिकारी आकाश लिगाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना देण्यात आले. पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी राजमाने यांच्या वतीने निवेदन स्वीकारले.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करून सुस्कृंत महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचे काम भिडे करीत आहेत. असे वादग्रस्त भिडे दि. 3 ऑगस्ट रोजी चिपळूणच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. भिडे यांच्याबाबत जनमानसात प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत भिडेंचा दौरा झाल्यास सुसंस्कृत तसेच सामाजिक सलोखा राखण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या चिपळूण शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण तालुका काँग्रेससह, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांच्यासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी एकत्र येऊन भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकणातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत भिडे यांच्या कोकणातील कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करून तीव्र निदर्शने केली जातील. तरी कृपया भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला परवानगी नाकारावी, ही नम्रपूर्वक विनंती.

यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष सावंत-देसाई, संभाजी ब्रिगेडचे सुबोध सावंत-देसाई, मकरंद जाधव ,रिपब्लिकन सेनेचे संदेश मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शिरीष काटकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, तालुका सरचिटणीस विलास मोहिते, चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव संजय जाधव, माजी नगरसेवक कबीर काद्री, छत्रपती शिवाजी मुस्लीम विचार मंचचे अध्यक्ष मुझफ्फर सय्यद, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलजार कुरवले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, शहर उपाध्यक्ष मनोज दळी, बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम, काँग्रेसच्या सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष रुपेश आवले, समता सैनिक दलाचे संतोष मोहिते यांच्यासह चिपळूण तालुका काँग्रेससह, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांच्यासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here