चिपळूण ; सावर्डे येथील मंदिराच्या पायऱ्या काढल्यानंतर स्थानिकांसह शिवसैनिकांनी केली रस्त्यावरच महाआरती

0
425
बातम्या शेअर करा

चिपळूण -मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या रस्ता रुंदीकरणात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने काढल्यानंर आक्रमक झालेल्या स्थानिकांसह शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली भजन आणि महाआरती मंदिराशेजारीच महामार्गावर करून शासन-प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे सावर्डे येथील शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या वर्षभरापूर्वी तोडल्या गेल्या. त्यामुळे मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. या पायऱ्या नसल्याने वर्षभर पूजा अर्चा बंद आहे. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.

या पार्श्वभूमीवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शंकराच्या मंदिराच्या समोर स्थानिकांसह शिवसैनिकांनी महामार्गावर महाआरती व भजन केले. यातून सरकारवर ताशेरे ओढण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र सुर्वे, उपतालुकाप्रमुख लक्ष्मण कोकमकर ल, मुर्तवडे युवा विभाग प्रमुख दिनेश वहाळकर, दिनेश घोरपडे, वसंत गोमले, विजय नेवरेकर, अनंत निर्मळ, नयन कुळे, सिताराम वणे, संभाजी पालशेतकर, विजय तांदळे, जयराम म्हालीम, तुकाराम मेस्त्री, राजेश शिरकर, सुनील शिरकर, मनोज खांडेकर, संतोष लाड, सागर सावंत, प्रशांत सावंत, चिराग सावंत आदी उपस्थित होते


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here