रत्नागिरी- स्फोटके भरलेला एक टॅंकर मुंबई ते गोवा महामार्गावरुन प्रवास करत असल्याचा फोन आज पोलिस कंट्रोल रुम ला आला. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करुन हा टॅंकर थांबवण्यात आला. मात्र यात कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळुन आली नाहीत.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की कंट्रोल रूम येथे एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की स्फोटके असलेला एक टॅंकर मुंबई ते गोवा जात आहे. ह्या माहिती आधारे त्याप्रमाणे लागलीच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. या नाकाबंदी दरम्यान सदर टँकर हा संगमेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान थांबविण्यात आलेला आहे व याची सर्व बाजूने पोलिसां मार्फत तपासणी करण्यात आली तसेच बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे देखील कसून प्राथमिक तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्यान संशयित टँकर मध्ये कोणतीही बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ मिळून आलेले नाहीत अशी माहीती पोलिसानी दिली आहे