गुहागर – गुहागर तालुक्यातील जामसुद येथे मोटरसायकल वरून जाणाऱ्या एका चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याची घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर चोराचा मार्ग काढत गुहागर पोलिसांनी अवघ्या दोन तासात सदर चोराला पकडल्याने सर्वत्र गुहागर पोलिसांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
सध्या अनेक चाकरमानी शिमगाउत्सवासाठी गुहागर तालुक्यात आले आहेत त्याचाच फायदा या भुरट्या चोरांनी घेतला आज गुहागर तालुक्यातील जामसुद येथे रस्त्याने चालणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली काही कालावधीतच ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली यावेळी गुहागर पोलीस दलातील एपीआय तुषार पाचपुते यांनी आपल्या कौशल्यपणाला लावत सीसीटीव्हीच्या माध्यमातून सदर चोराचा दोन तासात तपास लावला सदर चोराला त्याच्या राहत्या घरातील नरवण या ठिकाणाहून ताब्यात घेतले. या चोराला ताब्यात घेतल्यानंतर गुहागर पोलीस यांनी त्याने अजून कोणत्या चोऱ्या केल्यात का याची माहिती घेत आहेत. यावेळी गुहागर पोलीस दलातील एपीआय तुषार पाचपुते पीएसआय कांबळे ,स्वप्नील शिवलकर, वैभव चौगुले, प्रितेश रहाटे ,लोकमान तडवी ,उदय मोने ,अमोल गायकवाड ,प्रथमेश कदम आदी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत या चोराला दोन तासात पकडले.सर्वत्र या सर्व टीमचे सध्या कौतुक होत आहे.
या आधी सुद्धा एपीआय तुषार पाचपुते यांनी चिखली येथे झालेल्या खून प्रकणातील आरोपीला दोन तासात पकडण्यात यश आलं होतं. त्यामुळे यावेळी हे त्यांचं सगळीकडे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.