आबलोली -(संदेश कदम)- कोकण आणि शिमगोत्सव यांच अनोखं नात आहे . गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी यांच्या पालखी भेटीचा तीन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगताना दिसला गळाभेटीने आबलोलीतील शिमगोत्सव उत्साहात , शांततेत व फटाक्या़ंच्या , ढोलताशांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला हा सोहळा प्रत्यक्ष पहाताना डोळ्यांचे पारणे फीटल्याचा अनुभव प्रत्यक्ष पहायला मिळाला नवलाईदेवीची गळाभेट होताना दोन्हीं पालखींच्या आतील नारळांची आपो – आप अदला बदल होते अशी अंख्यांकीका सांगण्यात येते.
आबलोली खालील पागडेवाडी येथील जे – जे मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने श्रध्दापूर्वक कडक उपवास करतात ते रमेश गोणबरे , सुरेश गोणबरे , दिलीप गोणबरे , राजेश गोणबरे , प्रमोद गोणबरे हे मानकरी नवलाईदेवीच्या पालखी समोर सहाणेवर नतमस्तक होऊन धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर हाणून घेतात मात्र यावेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही एकुणच हा पालखीभेट , गळाभेट सोहळा भक्तांसाठी , भावीकांसाठी नेत्रसुख असते या पालखीभेट ,गळाभेट सोहळ्याला आबलोली – खोडदे पंचक्रोशीतील जनता बहूसंख्येने उपस्थित होती
फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली – खोडदे येथील होम पेटवीले जातात आणि दुपार नंतर आबलोली येथील श्री. नवलाईदेवी , खोडदे गणेशवाडी येथील श्री. नवलाईदेवी , खोडदे सहाणेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्हीं पालख्या तिन्हीं बहिणी आपल्या लाडक्या भावाला गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील होळीच्या मैदानावर नाचवीण्यात येतात याचवेळी दुपारनंतर सहाणेवर जत्राही भरते देवींच्या दर्शनानंतर भावीक , नागरीक व लहान मुले जत्रेत खरेदीही करतात
विशेष म्हणजे आबलोली येथील श्री. नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे येथील श्री. नवलाईदेवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात . या बहिणी गळाभेट घेताना या देवतांमध्ये बहिणींच नातं असल्याने ग्रामस्थ आवर्जुन सांगतात यावेळी दोन्हीं गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणा-या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर ऊभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत – गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिष बाजीत एकमेकांची गळाभेट करतात व पालख्यांचीही गळाभेट होते . यावेळी दोन्हीं पालख्यांची , दोन्हीं बहिणींची गळाभेट होताना आतील नारळांचीही अदला – बदल होते अशी अख्यांकीका आवर्जुन सांगीतली जाते आबलोली – खोडदे पालख्यांची, श्री. नवलाईदेवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजुस ग्रामस्थ नाचवीत असतात पहिली पालखी भेटून निघुन गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदैवतेला भेटते अतिशय शिस्तबध्द उत्साहात हा सोहळा पार पडतो आबलोलीतील होळीच्या मैदानावर रंगणारा हा पालखीभेट , गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे