माजी आमदार संजय कदम यांना एसीबीची नोटीस..

0
658
बातम्या शेअर करा

खेड – दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीने नोटीस बाजावल्याने खळबळ उडाली आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असतानाच त्यांना ही नोटीस बाजवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सन 2014 ते 2019 या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना संजय कदम यांनी बेकायदेशीरपणे इमारती व क्रशर उभारल्याची तक्रार झाली असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. इमारत बांधताना विहीर बुजवल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली असून माजी आमदार संजय कदम हे या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार संजय कदम यांना ओळखले जाते. आता एसीबीची नोटीस निघाल्याने दापोली विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here