चिपळूण ; त्या बेकायदेशीर बंगल्याला राजकीय आश्रय .. नगरपालिकेची भूमिका संशयास्पद..?

0
460
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीत अतिक्रमणे ,अनाधिकृत आणि बेकादेशीर बांधकामाचा याविषयी वृत्त प्रसिद्धच होताच अनेक प्रकरण पुढे येताना दिसत आहेत. मात्र चिपळूण नगरपालिकेने सदर बांधकामना नोटीस देऊनही ते बांधकाम बंद न झाल्याने या बांधकामाला पाठिंबा कोणाचा..? याबाबत सध्या चर्चेला वेग येतोय तर नगरपालिका या बांधकामावर कारवाई का करत नाही.असा प्रश्नही त्या निमित्ताने पुढे येत आहे.

चिपळूण ; या बांधकामाला परवानगी कधीची चर्चेला उधाण

चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या भोगाळे परिसरातील एका बंगल्याचे बांधकाम जून मध्ये सुरू झाले होते. याबाबत प्रगती टाइम्सने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिकेने सदर बांधकाम करणाऱ्या मालकाला एक ऑगस्ट रोजी नोटीस काढून हे बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले तसेच ते बांधकाम अनाधिकृतपणे करत असल्याने तोडण्याचे आदेश दिले. मात्र असे आदेश देऊनही सदर बंगल्याचे बांधकाम त्यानंतर जवळपास दुप्पट वेगाने करत तीन मजला होईपर्यंत पूर्ण झाल्याचे सध्या दिसत आहे. मात्र असे असताना नगरपालिकेने नोटीस देऊनही हे बांधकाम पूर्ण कसे झाले.? तसेच नगरपालिकेने या बांधकाम बाबत कारवाई का नाही केली. या बेकायदेशीर बांधकामाला कोणाचा पाठिंबा आहे. याबाबत सध्या संपूर्ण चिपळूण शहरात चर्चेला उधाण आले आहे सर्वसामान्य नागरिकांनी थोडं जरी अतिक्रमण केलं तरी नोटीस देऊन बांधकाम पाडणारी नगरपालिका आता या बंगल्या बाबत काय भूमिका घेणार अनाधिकृत असलेला हा बंगला जमीन दोस्त करणार का ..? असे प्रश्न त्या निमित्ताने उभे होते याबाबत चिपळूण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची भेट चिपळूणच्या पत्रकारांनी घेतली असता त्यांनी आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मोघम उत्तर दिलं. त्यामुळे खरोखरच हा बंगला जमीन दोस्त होणार का? याच्यावर कारवाई होणार का याची चर्चा सध्या चिपळूण सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.

सदर बंगल्या बाबत चिपळूण मधील पत्रकार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना भेटले याबाबत त्यांनी माहिती घेतली अशी माहिती एका राजकीय नेत्याला मिळताच त्याने पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सदर बंगल्याचे मालक हे राजकीय उभरत्या आणि राजकारणात पुन्हा नशीब आजमावू पाहणाऱ्या एका कार्यकर्त्याचे जवळचे मित्र आहे,पण पत्रकारांनी त्याचा हा दबाव व आमिष धुडकावले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here