गुहागर (मंगेश तावडे )- रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात प्रथम कोरोना रुग्ण हा शुंगारतळी सापडला होता. त्यानंतर काही नागरिकांना कोरोना होऊन नंतर गुहागर तालुका हा संपूर्ण कोरना मुक्त झाला होता. आता याच गुहागर तालुक्यातील चिखली येथे आज तब्बल 24 कोरना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिखली आता हॉटस्पॉट बनले असून संपूर्ण चिखली आयसोलेट करण्याची मागणी होत आहे.
गुहागर – चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली हे गाव या गावात गेल्या दोन दिवसापूर्वी सहा जण कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडले होते. त्याचवेळेला चिखली हे हॉट स्पॉट होणार अशी सगळीकडे चर्चा होती. यात आज चिखली येथे तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. आज गुहागर तालुक्यात एकूण 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असुन यातील दोन शुंगारतळी येथील आहेत. आता गुहागर तालुक्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या 48 झाली आहे.