मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने आज जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनामुळे राज्यात एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे. मात्र यामुळे एस टी कर्मचारी वर्गातून नाराजीचे सूर येत आहेत. यामध्ये २०१९ ची भरती सेवा स्थगित करण्यात आली आहे.
