गुहागर ; आरजीपीपीएल पुन्हा सुरू होण्यासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधानांची भेट घेणार – सुनील तटकरे

0
115
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यातील महत्त्वपूर्ण असा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणार आरजीपीपीएल प्रकल्प पुन्हा सुरू होण्यासाठी आपण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

आज आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत दिली तसेच हा आरजीपीपीएल प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुर्वीचा एन्राॅन म्हणजे रत्नागिरी गॅस अँण्ड पाँवर प्रकल्प गेले अनेक दिवस अडचणीत सापडला आहे.साहजिकच यामुळे येथील कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.यासाठी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी आता पुढाकार घेतला असून आज गुहागरातील राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेतल्यानंतर तटकरे यांनी आरजीपीपीएल अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन एकूणच प्रकल्पाची असलेली परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की या प्रकल्पासाठी आपण येत्या काही दिवसात पंतप्रधानांची भेट होण्यासाठी पवार यांच्याकडे आग्रह धरणार आहे.
2 हजार मेगावटची क्षमता असलेला आरजीपीपीएल म्हणजे रत्नागिरी पाॅवर अँण्ड गॅस प्रकल्पातून वीज निर्मीती बंद आहे. यासाठी प्रकल्पाची स्थिती जाणून घेण्यासाठी आरजीपीपीएल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत खासदार सुनिल तटकरे यांनी विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्यासाठी भारत सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि शरद पवारांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे.तसेच पंतप्रधानांच्या भेटीवेळी आपण देखिल या बैठकिला जाणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले. कोकणच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा प्रकल्प गॅस वर आधारीत असल्याने प्रकल्पातून प्रदूषण नाही त्यामुळे हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले. दरम्यान हा प्रकल्प सध्या बंद असल्याने ६०० स्थानिक कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावेळी आरजीपीपीएलचे आसिमकुमार सामंता तसेच अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here