चिपळुण ; पुन्हा गोवा बनावटीची दारु पकडली

0
68
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते सुमारे २४ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारूची कारवाई ताजी असतानाच बुधवारी रात्री कळंबस्ते येथे एका घरात सुमारे ४ लाख ७२ हजार रुपयांची दारु येथील पोलीसांनी जप्त केली आहे. सलग दुसऱ्यांदा कारवाईचे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या कारवाई अपेक्षित असताना हा विभाग सुस्त का बनला आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

राजाराम तानाजी जोईल अशी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिपळूण पोलिसांनी गुटखा व गांजा विक्री विरोधात जोरदार मोहित उघ‌डली आहे. यामध्ये चिपळुणात लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. याप्रकरणी काहींना अटक देखील करण्यात आली. तसेच रेल्वे परिसरात गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. दरम्यान,दोन दिवसांपुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवा बनावट दारुची वाहतूक होत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह पथकाने कळंबस्ते येथे सापळा रचला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसारचा कंटेनर याठिकाणी आला असता पोलीसांनी कंटनेर चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यानंतर गाडीची तपासणी केली असता सुमारे २४ लाख ४५ हजार ७२ रुपयांची गोवा बनावटीची दारु तर १० लाख रुपयांचा कंटेनर असा ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली.

ही घटना ताजी असतानाच कळंबस्ते येथील एका घरात गोवा बनावटीच्या दारुचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास कळंबस्ते येथील मधुकर गमरे यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी या कारवाईत सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी पाग येथील राजाराम जोईल या व्यक्तीला ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ज्या घरात गोवा बनावटी दारुचा साठा सापडला ते घर जोईलने भाड्याने घेतले होते, अशी माहिती पुढे होत आहे.
तर सलग दुसऱ्यांदा कारवाईवरुन चिपळुणात गोवा बनावटीच्या दारुची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.


गोवा बनावटीची दारु असो अथवा गावठी दारु धंदे असो या अवेध धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून कारवाई अपेक्षित आहे. मात्र या विभागाकडून गेल्या काही दिवसात कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. यामुळे हा विभाग नेमके काय करत आहे? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here