गुहागर – खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केल्याने गुहागर तालुक्यातील पेवे येथील केंद्र शासनाचा ६ कोटी रुपयांचारस्ता अडचणीत आला आहे.या बेकायदेशीर कामांची सखोल चौकशी करुन पेवे सरपंचव ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पेवे ग्रामस्थांनीगुहागर गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पेवे ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने खासदार सुनील तटकरे व आमदार भास्करजाधव यांच्या सहकार्याने खामशेत पेवे मादाली पूल –कारुळ-खरेकोंड असासुमारे सात कि.मी.चा रस्ता २०२० मध्ये कोरसिस्टीम पध्दतीने मंजूर करण्यातआला व तसे पत्र पेवे ग्रामस्थांना प्राप्त झाले होते. असे असताना पेवेतीलजुना रस्ता ७ फूट रुंदीचा असताना या रस्त्याच्या दुतर्फा जमीन मालकांनाभेटून सुमारे ३० फूट रस्त्यासाठी संमत्तीपत्र घेण्याचे ग्रामस्थांनीनियोजन केले होते. परंतु याचदरम्यान, पेवे सरपंच सौ. भारती सावरटकर आणिग्रामसेवक डोलारी यांनी जमीन मालक आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता ०८जुलै २०२१ रोजी पेवे ग्रामपंचायतीची खोटी ग्रामसभा दाखवून व याग्रामसभेचे खोटे ठराव पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना देण्यातआले. या ठरावामध्ये सदर रस्त्यासाठी जमीन मालकांच्या संमतीची गरज नाही.जमीन मालकांची जमीन जात नाही असे विविध खोटे ठराव करुन दिले गेले आहेत.वास्तविक ८ जुलै २०२१ रोजी कोणतीही ग्रामसभा पेवेमध्ये झालेली नाही व तसेपत्रच ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना दिले आहे.
खोटी ग्रामसभा व खोटे ठराव केल्याने या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचीजमीन जाणार होती त्यांची सरपंच व ग्रामसेवक यांनी फसवणूक केली आहे.रस्त्यासाठी त्या जमीन मालकांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत जमीनदेण्यास नकार दिला आहे व तसे पत्र खासदार तटकरे यांना देण्यात आले आहे.सरपंच आणि ग्रामसेवकाच्या खोट्या कामांमुळे हा रस्ता अडचणीत सापडला आहे.अशाच पध्दतीने पेवे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाच्या खोट्या आणि चुकीच्या कामामुळे गावाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.ग्रामसभेमध्ये झालेला ठराव आणि मासिक सभेच्या ठरावावर सरपंच सही करत नाहीत. यामुळे अनेक कामे रद्द झाली आहेत. यामुळेच गेल्या सात मासिक सभातहकूब झाल्या आहेत. याबाबत पेवे ग्रामपंचायतीतर्फे गटविकास अधिकारीयांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
दरम्यान, या तक्रारींबरोबरच १२ विविध तक्रारी ठोस पुराव्यासह ग्रामसेवक वसरपंचाविरोधात करण्यात आले आहेत. याविषयी गंभीर दखल चौकशी अधिकाऱ्यांनीघेतली आहे.
– फौजदारीस्वरुपाचा गुन्हा दाखल करावा
या निवेदनाची दखल घेत गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी २७ आँक्टोबर२०२२ रोजी प्रत्यक्षात ग्रामपंचायत पेवे येथे केली. या चौकशीमध्ये जेतक्रारीत नमूद केले आहे त्या प्रत्येक बाबीचे पुरावे ग्रामस्थांनी सादरकेले व तेच पुरावे ग्रामपंचायत दप्तरी मिळाले. त्यामुळे या सर्व प्रकरणातसरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याची पुराव्यासह खात्री अधिकाऱ्यांनी केलीआहे. म्हणून त्यांच्यावर तातडीने फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखलहोण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात दाखल करावा, अशी मागणी पेवे ग्रामस्थांनी केली आहे.