चिपळूण ; पोलिसांनी पकडली ३५ लाख रुपये किंमतीची गोवा दारू

0
309
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण पोलिसांनी बेकायदेशीर दारू वाहतूकीविरुद्ध मोठी कारवाई करत गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची विविध प्रकारची दारू आज पकडली. यामध्ये ही दारू वाहतूक करणारा कंटेनर आणि चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

चिपळूण पोलीस स्थानक येथून देण्यात आलेल्या माहिती नुसार मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे १.४४ वा. कंटेनर (क्रमांक एम.एच १४ एच.जी ७५२९ ) ही गाडी गोवा येथून मुंबई दिशेने जात असल्याची टीप चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गांवर कंटेनर हेरून आणि कंटेनर चालक याच्या संशयास्पद हलचालीवरून कंटेनरचा पाठलाग केला. तो कंटेनर चिपळूण येथील कळंबस्ते फाटा येथे पकडला या वेळी चालक बाबासाहेब सुखदेव बुधवन (वय वर्ष ४४, रा. मोर्शी ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कंटेनरमध्ये ३ लाख ४६ हजार ८९६ रुपये किंमतीची टूबर्ग बियर, २० लाख ९८ हजार १७६ रुपये किंमतीची विस्की असे एकूण ८८१ दारुचे बॉक्स आणि कंटेनर जप्त करण्यात आला असून कंटेनर आणि मुद्देमाल याची एकूण किंमत ३४ लाख ४५ हजार ०७२ रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.पोलीस कॉन्स्टबेल दिलीप विठ्ठल जानवलकर यांनी या बाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आरमाळकर आणि पोलीस या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here