गुहागर – रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या राजकारणतील एंट्रीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
रत्नागिरी जिल्हयातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची एंण्ट्री होऊ शकते. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांना शह देण्यासाठी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याची तयारी करण्याचे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाने केली असून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवार दयावी अशी मागणीच गुहागर मधील काहि युवा कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ही मागणी लक्षात घेऊन दिपक केसरकर यांनी कोकण विकासासाठी आणण्यात आलेली रत्नसिंधू समृद्धी योजनेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. आता याच नियुक्तीवरून किरण उर्फ भैय्या सामंत यांची राजकारणातील एंट्री आता निश्चित झाली आहे.
किरण सामंत यांचे रत्नागिरी बरोबरच गुहागर मतदारसंघातही मोठा चाहता वर्ग आहे. अलीकडेच आमदार भास्कर जाधव समर्थकांनी थेट किरण सामंत यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचा गुहागर तालुक्यातील असलेला संपर्क लक्षात घेवून कदाचित आ भास्कर जाधव यांचासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघात किरण उर्फ भैय्या सामंत यांची एंट्री होण्याची शक्यता सूत्रांनी वतर्वली आहे. गुहागरात विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक भाजपचा होता. पण २००९ साली शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदमांसाठी आपले वजन वापरून शिवसेनेकडे घेतला पण भाजपचे विनय नातू यांनी तेव्हा केलेल्या बंडखोरीमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांच्या ताब्यात गेला.त्यानंतर राष्ट्रवादी सोडुन शिवसेनेत गेल्यावरही भास्कर जाधव यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. उद्घव ठाकरे गटाचे शिवसेना नेते भास्कर जाधव याना आता शह देण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी या मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
किरण सामंत एक यशस्वी उद्योजक असून ते निवडणुकीत अनेक ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेतही दिसून येतात त्यांचा सर्वसामान्यशी असलेला जनसंपर्क व त्यांची कामाची पद्धत ही अनेकांना आवडते त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीमध्ये ते एक आवडते व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. याचा फायदा हा निवडणुकीसाठी होऊ शकतो म्हणून किरण सामंत यांना गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती अनेक जण करताना दिसत आहेत.