चिपळूण – नाशिक येथे अपघातानंतर बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात खासगी बसची जोरदार तपासणी मोहिम राबविण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील 54 खासगी बसची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 15 बसेसवर कारवाई करण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरीने जिल्ह्यातील खासगी बसेसची तपासणी सुरू केली. तपासणीत बसचा परवाना आहे की नाही, विशेष परवाना काढला आहे का?, योग्यता प्रमाणपत्र आहे का?, कर भरला आहे का?, बसमध्ये आपत्तकालीन दरवाज्याची व्यवस्था आहे का, बसच्या आतील भागात काही बदल केले आहेत का?, बसमधून माल वाहतूक सुरू आहे का?, अग्निशमन यंत्रणा आहे का? याची तपासणी करण्यात आली.उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरीने जिल्ह्यातील 54 खासगी बसची तपासणी केली.त्यामध्ये 15 बस दोषी आढळल्या आहेत. पाच बसकडे विशेष परवाना नव्हता. दोन बसकडे योग्यता प्रमाणपत्र नव्हते, दोन बसनी कर भरला नव्हता. 10 बसमध्ये आपात्कालीन दरवाजा नसल्याचे निदर्शनास आले. तीन बस मध्ये अग्निशमन यंत्रणा नव्हती. या 15 बसमालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे