गुहागर (प्रतिनिधी) – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पुरवठा केला जाणाऱ्या निकृष्ट, किडक्या, कुजक्या धान्यपुरवठ्याची चौकशी करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डाँ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक क्षेत्रामध्ये इंजिनिअरींग कारखान्याकरीता परवानगी दिलेल्या शेडमध्ये महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर को आँप फेडरेशन लि. मुंबई या नावाचा बोर्ड लावलेल्या ठिकाणी अत्यंत किडलेला, कुजका असा धान्याचा साठा असल्याचे 10 जुलै रोजी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणाची पाहणी केली होती. दरम्यान, प्रत्यक्ष पाहणी केली असता रत्नागिरी, सिंधुदुर्द जिल्ह्यातील 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुलांसाठी येथून अत्यंत खराब प्रकारच्या डाळी, कडधान्य, तिखट, हळद आदींचा पुरवठा केला जात होता. अन्न व औषध प्रशासनाने इतक्या अस्वच्छ जागेमघ्ये धान्याची साठवणूक व पँकींग करण्याची कोणत्या आधारावर परवानगी दिली. तसेच अनेक प्रकारचे खराब व कुजके धान्य आवारात व रस्त्यावर टाकून सार्वजनिक आरोग्यास बाधा येईल अशाप्रकारचे काम करणाऱ्यांवर कारवी होणे गरजेचे आहे. या गोडामध्ये उपस्थित असणाऱ्या कामगारांमार्फत अस्वच्छ दुर्गंयुक्त वस्तूंच परिसराबाहेर टाकून व काही प्रमाणात जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची खेळण्याचा हा प्रकार असून या प्रकारणाची चौकशी व्हावी. गोडावूनमधील वजन काट्यांचे वैधमापन अधिकाऱ्यांनी प्रमाणीत केलेले आहे का, आदी प्रश्न उपस्थित झालेले असून या प्रकरणाची चौकशी व्ही, अशी मागणी डाँ. नातू यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.