चिपळूण – गुहागर-विजापूर या महामार्गावरील चिपळूण शहरात येताना साखरवाडी दत्त एजन्सी फाटा येथे मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात अनेक जण आपटून अपघात ग्रस्त झाले आहेत.व अजून ही या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. याबाबत चिपळूण युवासेना आक्रमक झाली. महामार्ग अधिकार्यांशी चर्चा करून हे खड्डे त्वरित भरले जावेत, अशी मागणी केली. अखेर अधिकार्यांनी हे खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले. हे खड्डे भरले गेले नाहीत तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे शहरप्रमुख निहार कोवळे यांनी सांगितले. यावेळी उपतालुकाप्रमुख ऋषिकेश नलावडे, शाखाप्रमुख हेमंत मोरे, उपशहरप्रमुख पार्थ जागुष्टे, विनायक रेडीज व पदाधिकारी उपस्थित होते.