गुहागर – सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या गुहागर तालुक्यातील पालपेणे गावची ग्रामसभा आज पार पडली. या विशेष ग्रामसभेत गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला. आता या गावात विधवेचे ना कुंकू पुसले जाणार, ना बांगडी फोडली जाणार.. ना जोडवी काढली जाणार….सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आणि विधवा प्रथा बंद करुन पालपेने गावाने जिल्ह्यासमोर नवा आदर्श निर्माण केला.
विधवा प्रथेसारखी अत्यंत वाईट व अनिष्ट असणारी प्रथा या गावाने मोडीत काढली आहे. ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. राज्यात निरनिराळ्या गावापाठोपाठ गुहागर पालपेने गावाने ही विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केल्याने गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.
या ग्रामसभेला कार्यतत्पर सरपंच यांनी ही विधवा प्रथा बंदीची संकल्पना मांडली व त्याविषयची इत्यंभूत माहिती ग्रामसभेला दिली. या आधी काही दिवस गावातील सर्व वाडी मध्ये जाऊन ज्येष्ठ गावकरी, मानकरी यांचेशी चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने
यावेळी सरपंच योगिता पालकर उपसरपंच रघुनाथ घाणेकर, नंदिनी खीचाड, कीर्ती टाणकर, दिलीप पाण्डे, संतोष मांडवकर, संतोष पडवेकर, सुवर्णा महाडीक, सौ. राधिका पालकर (सर्व सदस्य), पो. पा. कमलाकर आदवडे, नेटामुक्ती अध्यक्ष -संजल पालकर, ग्रा.वि.अ जाधव शिक्षक अरविंद पालकर, पाटील सर, उमेश खैर, सिवारात नवरत् सर, तलाठी नागरगोजे ग्रा.पं. कर्मचारी तसेच डॉ. कराड, सोनवणे सर्व ग्रामस्थ, महीला उपस्थित होत्या.