चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण; गतवर्षीच्या आठवणी आजही मनात ताज्या

0
286
बातम्या शेअर करा

चिपळूण – आज 22 जुलै हा दिवस म्हणजे महाड आणि चिपळूणकरांच्या आठवणीतला दिवस आहे. या दिवशीं म्हणजेच गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे या दोन्ही शहरांना महापुराचा फटका बसला आणि क्षणांतच सारं उध्वस्त झाल होतं.

त्यानंतर या दोन्ही शहरात आज एका वर्षांत काय बदल झाला आहे आणि यंदाचा पावसाळा कसा आहे?गतवर्षीच्या महापूराच्या आठवणी आजही मनात ताज्यागेल्या वर्षी 22 जुलै रोजी धोधो बरसणाऱ्या पावसामुळे महाडच्या सावित्री आणि चिपळूणच्या वाशिष्टी नदीला पूर आला. या दोन्ही नद्या या शहरातून वाहत असल्याने या नद्यांचे पाणी शहरात शिरुन शहराचे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही शहरातील पाण्याची पातळी 7 ते 8 फुटांपेक्षाही जास्त असल्याने शहरातील घरांत, दुकानांत पाणी शिरले. काही ठिकाणची घरें अक्षरशः पडली तर काहींचा संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेला. आयुष्यभर पै पै जमा करुन ठेवलेल सारंच वाहून गेले.या घटनेला आज वर्षे झालेएवढंच नाही, तर या महापुरात मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीचा पुल व परशुराम घाटाचा काही भाग खचल्याने महामार्गावरील वाहतूक आठवडाभर बंद करण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी करून घाट पुन्हां सुरु करण्यात आला होता. या घटनेला आज वर्षे झाले. एक वर्षांत या घाटाचे काम अवघे 65 टक्केच पूर्ण झाले. तर चिपळूणचा एनरॉन पूल एका बाजूला खचला आहे. या पुलाविषयी अधिवेशनात आवाजही उठवला गेला, परंतु आजवर पुलाचे काहीच काम झालेले नाही.नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या इमारती, चाळी ओसगतवर्षी झालेल्या महापूराची भिती अजूनही चिपळूणकरांच्या मनामध्ये आजही कायम आहे. नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या इमारती, चाळी ओस पडल्या आहेत. पावसाळ्यात इथे कोणीच राहत नसून काही रुम मालक आपले रुम विकून दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत. महापूराचे पाणी ओसरल्यावर चिपळूणकरांनी एकच मागणी शहरातून वाहणाऱ्या दोन नद्यांच्या पात्रातील गाळ उपसा व्हावा. यासाठी चिपळूणवासियांनी वेगवेगळी आंदोलने, उपोषणेही केली. या गाळ उपशाच्या मागणीनंतर नाम फाउंडेशनने पुढाकार घेउन शिव नदीचा गाळ आणि प्रशासनामार्फत वाशिष्टीचा गाळ उपसा करण्यात आला.त्यामुळे यंदाच्या पावसात वशिष्टीच पात्र भरले पण पाणी पात्राबाहेर आले नाही..यंदा पुराचा कोणताही धोका जाणवला नाही.यंदा प्रशासन वेळीच अलर्टगेल्या वर्षीच्या पुराचा आढावा घेत यावर्षी मात्र प्रशासन वेळीच अलर्ट झाले. पावसाळ्यापुर्वीच आपत्ती व्यवस्थापन, पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन जिल्हाधिकारी यांनी बैठका घेउन पावसामुळे कुठे सतर्क राहिले पाहिजे? काय केले पाहिजे? याचे नियोजन केले. इतकेच नव्हे तर पावसाच्या सुरुवातीलाच शहरात NDRFची पथके तैनात करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड आणि महाड मधील तळीये या गावात दरड वस्तीवर येऊन अनेक जणांचा यात मृत्यू झाला होता..त्यामुळे वेळी दरडप्रवण क्षेत्रात अतिदक्षता घेण्यात आली होती. चिपळूण आणि महाड शहरात गतवर्षीच्या महापूरातून हळूहळू सावरतय..पण या घटनेच्या आठवणी आणि भिती ह्या कायमस्वरूपी मनात राहणार आहेत.. 


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here